व्यापारी संकुलात उपोषण; १४ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:14 PM2017-11-19T23:14:31+5:302017-11-19T23:15:00+5:30
आष्टी येथील व्यापारी संकुलासमोर बेकायदेशीर बसून व्यापारी संकुलातील गाळ्यात ठाण मांडल्याप्रकरणी तसेच ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात १४ जणांविरु द्ध रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील व्यापारी संकुलासमोर बेकायदेशीर बसून व्यापारी संकुलातील गाळ्यात ठाण मांडल्याप्रकरणी तसेच ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात १४ जणांविरु द्ध रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सर्व उपोषणकर्त्यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले .
या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी धोंडीभाऊ भाऊराव काळे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी आष्टी येथील महात्मा जोतिबा फुले व्यापारी संकुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी सरपंच अमोल आष्टीकर व पर्यवेक्षक प्रमोद वीर यांच्यासह कामाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, तिथे गावातीलच जाफर गफार शेख, फारुक गुलाम दस्तगीर, ताहेरकठू पटेल, शिकूर सत्तार बागवान, महेमूदखाँ कासमखाँ पठाण, अ. खदीर गुलाम दस्तगीर, कलीम ईस्माईल बागवान, शे. दगडू जलाल शे.सरदार, अरेफ इब्राहिम कल्याणकर, सय्यद अजीम अकबर, अली पठाण यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांनी व्यापारी संकुलात अनधिकृत प्रवेश केला. सरपंच, पर्यवेक्षकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता, कामकाज बंद पाडले. व्यापारी संकुलासमोर मंडप टाकून तिथे उपोषणाला बसून सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार तपास करीत आहेत.