वडिलांनी हातगाडीवर विकले फुटाणे; आई शिक्षिका अन् मुलगा झाला सॉफ्टवेअर इंजिनिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:32 AM2019-12-16T00:32:24+5:302019-12-16T00:32:28+5:30
हातगाडीवर कुल्फी, चने-फुटाणे, जांभूळ विक्री करणारे सुनील वखारे आणि शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या अरूरुणा वखारे यांचा मुलगा ओंकार वखारे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हातगाडीवर कुल्फी, चने-फुटाणे, जांभूळ विक्री करणारे सुनील वखारे आणि शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या अरूरुणा वखारे यांचा मुलगा ओंकार वखारे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. नुकताच त्याने मूळ अमेरिकेची असलेल्या आणि बेंगलोर येथे सुरू असलेल्या कंपनीत नोकरी मिळविली असून, त्याला वार्षिक १६ लाख रूरुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
जुना जालना भागातील गवळी मोहल्ला भागात राहणारे आणि सहावीपर्यंत शिक्षण घेतलेले सुनील वखारे हे कुल्फी, चने-फुटाणे, चांभूळ विक्रीचा व्यवसाय करीत होते. तर त्यांच्या पत्नी अरूणा वखारे यांनी लग्नानंतर बी.ए. डी.एड्. शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. मात्र, त्या काळी पगारही कमी होता. सुनील वखारे यांच्या उत्पन्नातून घर चालत नव्हते. अरूणा वखारे यांची पगार कमी होती. तरीही मोठ्या काटकसरीने संसाराचा गाडा चालविला. मुलगा ओंकार याला नगर परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण दिले. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण सरस्वती भुवन शाळेत घेतले. शिक्षण घेताना घरातील समस्या त्याने जाणल्या होत्या. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्याने ओळखले होते.
अकरावी आणि बारावीचे शिक्षण औरंगाबादेतील वसंतराव नाईक महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर ओंकारने जे.ई.चा अभ्यास पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद येथीलच खासगी कोचींग क्लासेसला प्रवेश मिळवला. जेईमध्ये तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांमधून ओंकार वखारे याला भारतातून २३१९ वी रँक (नंबर) मिळाली. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास बळावला आणि अभ्यास सुरूच ठेवला. त्यानंतर ओंकारला आयआयटीसाठी प्रवेश मिळाला. या परीक्षेतही त्याने गरुडझेप घेत भारतातून ७२०६ ची रँक प्राप्त केली. आयआयटी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर ओंकार वखारे याचा (भारतीय प्रयोद्योगिकी संस्था) खडकपूर या संस्थेत एरोसपेस इंनिनियरिंगच्या बी. टेक प्लस एम. टेक या पाच वर्षाचा अभ्यासक्रम त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला. हा कोर्स सुरु असताना अमेरिकास्थित बेंगलोरमध्ये असलेल्या हनीवेल या नामांकित कंपनीत त्याची सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. जॉयनिंग बोनस म्हणून कंपनीने ओंकार वखारे यास दोन लाखाचा बोनस दिला असून, सोळा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देखील मिळाले आहे. हनीवेल ही अमेरिकेची नामांकित कंपनी असून बेंगलोरमध्ये असलेल्या या कंपनीत विमानाचे पार्ट, इंजिन व इतर साहित्याची डिझायनिंग तयार करण्यात येते. दरम्यान, ओंकार वखारे याने कुटुंबातील समस्या, अडचणींवर मात करून मोठ्या जिद्दीने केलेला अभ्यास आणि मिळविलेली नोकरी इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
आई-वडिलांचे कष्ट, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने मला यश मिळाले आहे. यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश मिळते असे ओंकार वखारे यांनी सांगितले.