हमीभाव खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:48 AM2018-10-25T00:48:09+5:302018-10-25T00:48:36+5:30
जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील चार केंद्रावर २४ आॅक्टोबर पर्यत १,०७३ शेतकºयांनी हमीभावाने सोयाबीन, मूग, उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतक-यात संताप आहे. परिणामी, हमीभावापेंक्षा कमी दराने सोयाबीन, मूग, उडिद विकावा लागत असल्याने शेतकºयांत नाराजी सूर आहे.
जिल्ह्यात जालना, अंबड भोकरदन आणि अंबड या चार केंद्रावर नाफेडने ९ आॅक्टोबर पासून आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ केला. नोंदणी उशिराने सुरु होऊनही २४ आॅक्टोबर पर्यत १,०७२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, आणि उडिदाच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. उत्पन्न अर्ध्यावरच आल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच शासनाने हमीभाव जाहिर केला, मात्र प्रत्यक्षात अद्यापही हमीभावाने खरेदी सुरु केली नाही. दसरा सण तर गेला आता दिवाळी सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. असे असतांना शासनाने खरेदी सुरु न करता पुन्हा नोंदणीस मुदत वाढ दिल्याने शेतकºयांच्या दिवाळी सुध्दा अशीच जाण्याची भीती आहे. पेरणीसाठी केलेली उसनवारी ंआणि सणासुदीसाठी घरात पैसे असावेत यासाठी शेतकºयांना व्यापाºयांच्या दारी जावे लागत असल्याचे चित्र आहे. हमीभावापेंक्षा कमी भावाने सोयाबीन, मूग, उडिद शेतकºयांना विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीन, मूग, उडिद आदींसह बारा पिकांना हमीभावाने खरेदी करावी अशा सुचना शासनाने दिलेल्या आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सोयाबीनला ३,३९९ हमीभाव जाहिर केला आहे. असे असतांना सध्या शेतकºयांना २६०० ते ३०२५ पर्यंत सोयाबीन विकावे लागत आहे. त्यातच ओलावा आणि काडीकचरा असल्याने सांगून व्यापारी भाव पाडून मागत असल्याचे शेतकरी साहेबराव तुपे यांनी सांगितले.
मूग, उडिद नोंदणीला मुदतवाढ
शासनाने सोयाबीन, मूग, उडिद नोंदणीस १५ नोव्हेबर पर्यत मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ९ आॅक्टोबर पर्यत मुदतवाढ दिली होती. यात पुन्हा वाढ करत २४ आॅक्टोबर मुदत वाढ दिली होती. बुधवारी मुदतवाढ संपल्याने पणन महासंघाने उशिराने आदेश काढून ही मुदत १५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.