‘नो स्मोकिंग’ला फिल्म फेस्टिव्हलचा तृतीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:20 AM2020-03-05T00:20:41+5:302020-03-05T00:20:50+5:30

महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल २०२० मध्ये येथील अभिजित चव्हाण दिग्दर्शित ‘नो स्मोकिंग’ या टीव्ही स्पॉट अ‍ॅडला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले

Film Festival's Third Prize to 'No Smoking' | ‘नो स्मोकिंग’ला फिल्म फेस्टिव्हलचा तृतीय पुरस्कार

‘नो स्मोकिंग’ला फिल्म फेस्टिव्हलचा तृतीय पुरस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल २०२० मध्ये येथील अभिजित चव्हाण दिग्दर्शित ‘नो स्मोकिंग’ या टीव्ही स्पॉट अ‍ॅडला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
पुणे येथे झालेल्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये राज्यातून २२२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातील १६ स्पर्धकांना पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. किशोर डांगे निर्मित व अभिजित चव्हाण दिग्दर्शित ‘नो स्मोकिंग’ मध्ये धुम्रपान रोखण्याबाबतचा संदेश देण्यात आला आहे.
यात विनोद जोमवाडे यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका बजावली आहे. तर ओम साळवे, मयुर निकम, जोय गायकवाड यांनी सहकलाकार म्हणून भूमिका केली आहे.

Web Title: Film Festival's Third Prize to 'No Smoking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.