.....अखेर रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:03+5:302020-12-31T04:30:03+5:30

तळणी : गावात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या वादामुळे तब्बल ५ महिन्यांपासून रखडलेला होता. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द ...

..... Finally work on the stalled road begins | .....अखेर रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात

.....अखेर रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात

Next

तळणी : गावात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या वादामुळे तब्बल ५ महिन्यांपासून रखडलेला होता. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. यावृत्ताची संबंधित विभागाने दखल घेतली असून, रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

तळणी गावात जाणाºया मुख्य रस्त्याचे रूंदीकरण केवळ ५ मीटर करण्यात आले होते. रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. सरपंचासह विविध पदाधिकाºयांनी कंपनीच्या अधिकाºयांसोबत चर्चा करून सदर रस्ता १० मीटरचा करण्याचे ठरविले. मात्र, रस्ता रूंदीकरणास व्यापाºयांकडून विरोध झाला. तसेच रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्याला अनेकांनी विरोध केला. यासाठी तळणीचे सरपंच उध्दव पवार यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी व्यापाºयांशी चर्चा केली. त्यानंतर व्यापाºयांनी अतिक्रमण काढण्याला होकार दिला. त्यानंतरही काही व्यापाºयांनी रस्त्याचे काम बंद पडले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले पावसाळ्यात नागरिकांना चिखलातूनच ये-जा करावी लागत होती. याबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेऊन ग्रामस्थांनी सरपंचासह सर्वपक्षाच्या पदाधिकाºयांनी व्यापाºयांशी चर्चा करून अतिक्रमणचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर संबंधित कंपनीने रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. यासाठी तळणीचे सरपंच उध्दव पवार, ज्ञानेश्वर सरकटे, गौतम सदावर्ते, माजी सरपंच दिलीप सरकटे, कैलास सरकटे, दारासिंग चंदेल, तंटामुक्तीचे रितेश चंदेल, महादेव माने, डॉ. प्रविण सरकटे, बाळू गायकवाड यांनी प्रयत्न केले.

तळणीच्या मुख्य रस्ताच्या प्रश्नाबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविला. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाºयांचे सहकार्य घेऊन व्यापाºयांशी चर्चेतून मार्ग काढल्यामुळे रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

उध्दव पवार, सरपंच

Web Title: ..... Finally work on the stalled road begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.