क्रीडा प्रबोधिनीसाठी ९ लाख १ हजारांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:39+5:302021-03-09T04:33:39+5:30
जिल्ह्यातील उद्योन्मुख खेळाडूंना पुढे चालना मिळावी म्हणून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली. ...
जिल्ह्यातील उद्योन्मुख खेळाडूंना पुढे चालना मिळावी म्हणून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली. यात संपूर्ण जिल्ह्यातून विविध क्रीडा स्पर्धेत निपुण असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत क्रीडा शिक्षण दिले जात आहे. देशपातळीवरील उद्याचे खेळाडू तयार करणाऱ्या या क्रीडा प्रबोधिनीचा अधिकाधिक विकास व्हावा म्हणून नीमा अरोरा यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रत्येकी १ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी नीता नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींनी स्वखुशीने या योजनेत सहभाग नोंदविला होता. तालुक्यातून तब्बल ९ लाख १ हजार रुपये जमा झाले आहे. गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, घनसावंगीचे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, प्रबोधिनीचे प्रमुख खरात, शालार्थ तालुका समन्वयक किशोर चव्हाण, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर व सहशिक्षक, गटसमन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती.
===Photopath===
080321\08jan_21_08032021_15.jpg
===Caption===
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे निधी सुपुर्द करताना गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे व इतर