११ हातगाडेधारकांना ८०० रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:20 AM2020-02-13T01:20:08+5:302020-02-13T01:21:35+5:30
वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाडेधारकांविरूध्द शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाडेधारकांविरूध्द शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. गत दोन दिवसांत २२ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली असून, यातील ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संबंधितांना न्यायालय उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी ८०० रूपयांचा दंड ठोठावला.
शहर वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी शहरात दोन ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याचबरोबर आता रस्त्यावर हातगाडे उभे करून व्यवसाय करणाऱ्यांविरूध्दही शहर वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले व त्यांच्या टीमने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. प्रारंभी हातगाड्यावर व्यवसाय करणाºयांना वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची काळजी घ्यावी, रस्त्यावर हातगाडे उभे करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांचे पालन न करणा-या हातगाडेधारकांविरूध्द गत दोन दिवसांपासून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील मामा चौक, फूलबाजार, लक्कडकोट, गांधी चमन, मस्तगडसह इतर परिसरात रस्त्यावर हातगाडे उभे करणा-या २२ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली.