वीजचोरी प्रकरणी २१ जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:04 AM2018-07-15T01:04:17+5:302018-07-15T01:04:35+5:30
वालसावंगी येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत तब्बल २१ जणांना वीजचोरी करताना पकडले असून, त्यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भोकरदन : तालुक्यातील वालसावंगी येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत तब्बल २१ जणांना वीजचोरी करताना पकडले असून, त्यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कनिष्ठ अभियंता नीलेश पन्न्नामट्टी यांनी सांगितले की, वीजवितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी वालसावंंगी गावात अचानकपणे छापा मारून विजेच्या तारेवर आकडा टाकून वीजचोरी करणा-या २१ जणांना पकडले असून, त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.