तहसीलदार योगिता कोल्हे यांना मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:18 AM2018-07-28T01:18:22+5:302018-07-28T01:20:20+5:30
तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या कार्यालयात बळजबरीने घुसून खंडणी मागून , दमदाटी करून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी कांताबाई वाघमारे यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान बळजबरीने घुसून खंडणी मागून , दमदाटी करून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या तक्रारीवरून कांताबाई वाघमारे यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भोकरदन च्या तहसीलदार कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कार्यालयात कामकाज करीत असताना आरोपी वाघमारे या त्यांच्या कार्यालयात बळजबरीने घुसल्या व त्यांनी खंडणीची मागणी केली, तहसील दारांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना शिवीगाळ करून व अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिली.
तहसीलदारांच्या तक्रारीवरून कांताबाई वाघमारे यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून खंडणी मागितल्याप्रकणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार या करीत आहेत. एकूणच या प्रकारामुळे तहसील कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.