लोणीकरांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:57 AM2019-10-20T00:57:28+5:302019-10-20T00:57:56+5:30
राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरूध्द सेवली पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरूध्द सेवली पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हायरल व्हिडिओवरून देण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी विविध तांड्यावर बैठका घेतल्या. या बैठकांमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘सगळ्या तांड्यात मी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत मला कसलीही भीती नाही’ असे लोणीकर म्हणताना दिसून येतात. या प्रकरणी मोहाडी तांडा येथील विजय पवार यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी लोणीकरांना नोटीस दिली होती. मात्र, नोटीसीचा समाधानकारक खुलासा सादर न केल्याने शुक्रवारी सायंकाळी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.