घराला लागलेल्या आगीत नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:36 AM2020-02-21T00:36:04+5:302020-02-21T00:36:18+5:30
अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यातील अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरूवारी सकाळी घडली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन वाहनांना पाचरण करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
अंभोडा कदम येथील बाळासाहेब बोराडे यांच्या राहत्या घराला गुरूवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केली. ही बाब समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला माहिती दिली. परतूर, सेलू, जिंतूर आणि जालना येथून अग्निशमन दलाची वाहने बोलाविण्यात आली होती. वाहने येईपर्यंत ग्रामस्थांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत घरातील कपडे, धान्य, इलेक्ट्रिक वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळाला तहसीलदार सुमन मोरे, पोनि विलास निकम, मंडळाधिकारी, तलाठ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. आग अटोक्यात आणण्यासाठी देविदासराव बोराडे, परमेश्वर बोराडे, भारतशेठ बोराडे, शिवाजी बोराडे, बाळासाहेब गोरे, राधाकिसन बोराडे, भानुदास बोराडे, संपत राठोड, उत्तम ढाकरके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.