शहरात फायर सेफ्टीचे ‘आॅडिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:52 AM2018-03-14T00:52:24+5:302018-03-14T00:52:29+5:30
शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी इमारती, रुग्णालये, पेट्रोल पंप या ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत का, याची मुंबईच्या विशेष पथकाने मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीचा गोपनीय अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी इमारती, रुग्णालये, पेट्रोल पंप या ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत का, याची मुंबईच्या विशेष पथकाने मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीचा गोपनीय अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगितले.
मुंबई येथील कमला मीलमधील आगीच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था विभागाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात ‘ फायर सेफ्टी आॅडिटची द महाराष्ट्र फायर प्रिव्हेंटेशन अॅण्ड लाईफ सेफ्टी अॅक्ट २००६ ’नुसार तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईच्या तीन अधिकाºयांचे एक पथक मंगळवारी शहरात दाखल झाले. पथकाने अग्निशमन दलाचे प्रमुख जाधव यांना सोबत घेवून शहरातील विविध अस्थापना, शाळा, पेट्रोलपंप, मोठी रुग्णालये, व्यापारी इमारती याची तपासणी सुरू केली आहे. अचानक आगीच घटना घडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून इमारतीमध्ये अग्निशमन विरोधी यंत्र बसविले आहे का, तातडीने बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. इमारतीचे फायर सेफ्टी आॅडिट केले आहे का याची पथकातील अधिका-यांनी रात्री उशिरापर्यंत बारकाईने तपासणी केली. हे पथक आणखी दोन दिवस शहरातील विविध अस्थापनांसह शासकीय कार्यालयांचीही तपासणी करणार आहे. तपासणीचा गोपनीय अहवाल शासनास सादर केला जाणार आहे.