जालन्यात प्रथमच नौकायान स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:59 PM2018-10-20T17:59:36+5:302018-10-20T18:00:09+5:30

१३ व्या कनोर्इंग अ‍ॅण्ड कयाकिंग नौकायान स्पर्धेचे घाणेवाडी येथील संत गाडगे बाबा जलाशय येथे आयोजन करण्यात आले आहे.

For the first time organizing sailing competition in Jalna | जालन्यात प्रथमच नौकायान स्पर्धेचे आयोजन

जालन्यात प्रथमच नौकायान स्पर्धेचे आयोजन

googlenewsNext

जालना : महाराष्ट्र असोसिएशन आॅफ कनोइंग अ‍ॅण्ड कायाकिंग व जालना कनोर्इंग अ‍ॅण्ड कायालिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व्या कनोर्इंग अ‍ॅण्ड कयाकिंग नौकायान स्पर्धेचे घाणेवाडी येथील संत गाडगे बाबा जलाशय येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी होणार आहेत.

ही स्पर्धा २१ ते २४ आॅक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेकरीता राज्यभरातून सुमारे २५ संघ येणार असून, ही स्पर्धा दोन वयोगटात पार पडणार आहे. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आदींची उपस्थिती राहणार आहे.  सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक राज्य संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सचिव दिनेश मुंढे, उपाध्यक्ष वर्षा शिंदे, कोषाध्यक्ष जितेंद्र, अशोक बिडकर, डिंगबर नागरे, भागवत बावणे, मंगेश मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी देशमुख आदींनी केले.

४०० खेळांडूचा सहभाग
राज्यातील जवळ २५ संघ येणार असून, ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यात १६ वर्यागटातील मुले व मुली, १८ वर्षा वयोगटातील मुले व मुलींनी सहभाग घेतला आहे.

Web Title: For the first time organizing sailing competition in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.