पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बेपत्ता; प्रशासनाकडून २३ तासानंतर शोधकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:52 PM2019-10-01T17:52:27+5:302019-10-01T18:21:01+5:30

माहिती देऊनही प्रशासनाकडून २३ तासानंतर मदतकार्य

Fisherman missing in Purna river; After 23 hours search operation run by the administration | पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बेपत्ता; प्रशासनाकडून २३ तासानंतर शोधकार्य

पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बेपत्ता; प्रशासनाकडून २३ तासानंतर शोधकार्य

Next
ठळक मुद्देकानडी येथील घटना 

तळणी (जालना) : मंठा तालुक्यातील कानडी शिवारातील पूर्णा येथील नदीपात्रात मच्छिमारीसाठी गेलेला संतोष दत्तराम हिरवे (४१) हा मच्छिमार वाहून गेला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उस्वद- कानडी शिवारात घडली. मात्र, कल्पना देऊनही घटनेच्या २३ तासानंतर मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय यंत्रणेने शोधकार्य सुरू केले.

मंठा तालुक्यातील कानडी येथील संतोष हिरवे हा पूर्णा नदीपात्रात मच्छिमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. उस्वद- कानडी शिवारातील पूर्णा नदीपात्रात पाणी आल्याने संतोष हिरवे हा सोमवारी दुपारी मच्छिमारीसाठी गेला होता. मात्र, तो  वाहून गेला. घटनास्थळी उपस्थितांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीपात्रात शोध घेतला. मात्र, त्यातही यश आले नाही. 

घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, तहसीलदार सुमन मोरे, तलाठी नितीन चिंचोले यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच परतूर येथील अग्निशमन दलाचे पथक शोधकार्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत शोधकार्यासाठी पथकही दाखल झाले नव्हते. ४.३० वाजण्याच्या सुमारास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. हिरवे यांचे नातेवाईक व ग्रामस्थही शोध मोहीम राबवित आहेत.

माहिती उशिरा मिळाली
याबाबत तहसीलदार सुमन मोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, प्रशासनाला घटनेची माहिती उशिराने मिळाली. आम्ही परतूर येथील अग्निशमन दलाला तात्काळ माहिती दिली असून, त्यांनी शोध कार्य सुरू केले आहे.

मच्छिमारी करून करुन उदरनिर्वाह
संतोष दत्तराव हिरवे हा कानडी गावचा जावई आहेत. मागील ३ वर्षांपासून पूर्णा नदीकाठावर कुडाचे घर तयार करुन ते कुटुंबासह राहत होते. अत्यंत हालाखीची परिस्थिती असून, मच्छिमारी करुन ते पत्नी, एक मुलगी, चार मुलांचा उदरनिर्वाह करीत होते.

Web Title: Fisherman missing in Purna river; After 23 hours search operation run by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.