पाच लाख बीटी बियाणांची पाकिटे बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:51+5:302021-06-03T04:21:51+5:30
त्यातील ३ लाख १० हजार हेक्टर हे क्षेत्र कपाशासाठी असल्याचे दिसून आले. परंतु, यंदा कपाशीप्रमाणेच सोयाबीनला प्राधान्य राहणार असल्याचे ...
त्यातील ३ लाख १० हजार हेक्टर हे क्षेत्र कपाशासाठी असल्याचे दिसून आले. परंतु, यंदा कपाशीप्रमाणेच सोयाबीनला प्राधान्य राहणार असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता, दिसून आले. येथील मामा चौक, महावीर चौक, नरिमान रोड या भागात बी-बियाणांची दुकाने आहेत. तेथे आज फारशी गर्दी नसली तरी तुरळक शेतकरी हे आतापासूनच बियाणे खरेदीसाठी आले असल्याचे दिसून आले. सोयाबीनपाठोपाठ मक्याची बियाणेही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. महाबीज, तसेच अन्य खासगी कंपन्यांची बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, काही मोजक्या कंपनीच्या बियाणांची मागणी आजही कायम आहे. त्यात विशेष करून महाबीजच्या कपाशीचे नांदेड ४४ या वाणाला मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले.
चौकट -
आणखी पाहिजे तसा उठाव नाही...
खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, तसेच खतांची दुकाने आता सजली आहेत. वेगवेगळ्या कंपनीच्या वाणांची विचारपूस शेतकरी करीत आहेत. परंतु, अद्याप पाहिजे त्या तुलनेत खरेदीत वेग आलेला नाही. चांगला पाऊस पडल्यावर कृषी बाजारात गर्दी वाढेल.
अजय लड्डा, अध्यक्ष सीडस् असोसिएशन जालना.
चौकट
तीन सेंटिमीटरपेक्षा खोल पेरणी करू नये
गेल्या वेळप्रमाणे शेतकऱ्यांनी यंदा पेरणी करताना काळजी घ्यावी, विशेष करून सोयाबीनची पेरणी करताना ती जमिनीत केवळ तीन ते अडीच सेंटिमीटरपेक्षा खोल करू नये. तसेच पेरणी करण्यापूर्वी बुरशीजन्य खते बियाणांना लावावीत जेणेकरून अन्य रासायनिक आणि मिश्र खतांची जादा मात्रा देण्याचे काम पडणार नाही. गेल्यावेळी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी ही पाच सेटिंमीटरपेक्षा अधिक खोल केल्याने जास्त पाऊस होऊन अंकुर हा जमिनीबाहेर आला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
बाळासाहेब शिंदे, कृषी अधीक्षक जालना.