पाच वर्षांनंतर नदीपात्रात जनावरे धुण्याचा योग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:45 AM2019-08-30T00:45:27+5:302019-08-30T00:46:37+5:30
खांदेमळणीच्या दिवशी अर्थात गुरूवारी शेतकऱ्यांनी नदी पात्रात सर्जा- राज्याला धुण्यासाठी मोदी गर्दी केली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तब्बल पाच वर्षानंतर यंदा भोकरदन तालुक्यातील जुई, धामणा व केळना नदीच्या पात्रातून काळे पाणी वाहत आहे. यामुळे खांदेमळणीच्या दिवशी अर्थात गुरूवारी शेतकऱ्यांनी नदी पात्रात सर्जा- राज्याला धुण्यासाठी मोदी गर्दी केली होती़
तालुक्यात गेल्या चार- पाच वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे पोळ््याच्या सणाला नद्यांना पाणीच रहात नव्हते. मात्र यंदा तालुक्यातील उत्तर भागात चांगला पाऊस झालेला असल्यामुळे धामणा, जुई, रायघोळ या नद्यांना सद्यस्थितीत चांगले पाणी वाहत आहे. तर भोकरदन शहरातून वाहणाºया केळना नदीला सिल्लोड तालुक्यातील खेळणा धरण भरल्यामुळे काळे पाणी वाहत आहे. या चार नद्यांवर मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे व सिंमेट बांधाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला झाला आहे.
गुरूवारी खांडमळणीच्या दिवशी शेतात वर्षभर राब-राब राबणा-या बैलांना व इतर जनावरांना अंघोळ घालण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी पुर्णा व गिरजा नदी वगळता सर्वच नद्या व नाल्यांना पाणी असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना धुण्यासाठी नदी पात्रावर सकाळ पासूनच मोठी गर्दी केलेली होती.
पेरजापूर येथील शेतक-यांनी केळना नदीवरील बंधाºयाच्या खाली बैल धुण्यासाठी गर्दी केली होती. त्याच प्रमाणे धामणा, रायघोळ, जुई नदीवर बैल धुण्यासाठीही शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.
या नद्यांवर मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे व सिमेंट बंधा-याची कामे झालेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला असून, सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झालेली आहेत. या बंधा-यात सुध्दा शेतकरी बैल धुण्यासाठी आले होते़