पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:39 AM2020-01-12T00:39:33+5:302020-01-12T00:40:06+5:30

जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.

For five years, the birth rate of girls has been declining | पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंधश्रध्दा, हुंड्याच्या पध्दतीमुळे मुलीचा जन्म पालकांना नकोसा वाटत होता. वंशाचा दिवा ही संकल्पना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. पित्याचं नाव पुढे चालवणारी पितृसत्ताक कुटुंब पध्दती आजही स्त्रियांना कमी लेखते! परिणामी अनेक कुटुंबांमध्ये अद्यापही मुलींचा जन्म हे संकट मानले जाते. यामुळेच की काय, मागील पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात खालावला आहे. जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.
मुले आणि मुली यांच्या जन्मदारात असलेली किंचित नैसर्गिक तफावत स्त्रीभ्रूण हत्येमुळे की काय, २०१२-१३ पूर्वी बºयाच प्रमाणात रूंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर थेट जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाभरातील सोनोग्राफी सेंटरची एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. तसेच प्रत्येक सेंटरला कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत आदेशित केले होते. यानंतरही निर्देश पायदळी तुडविणाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आजही आरोग्य यंत्रणेकडून सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली जाते. याच्या जोडीलाच शहरासोबतच ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यात आली. लिंग निदान कायद्याने गुन्हा असल्याने या वाटेला कोणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुलगाच वंशाचा दिवा ही संकल्पना काही अंशी का होईना; धूसर झाली होती. परंतु, मागील पाच वर्षांपासून जालना येथील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी एक हजार मुलांमागे १०० मुली कामी असल्याचे समोर आले आहे.
२०१५-१६ साली जिल्हा शासकीय रूग्णालयात ६ हजार ०८१ मुले जन्मली होती. त्यापैकी ३१६४ मुले तर २९१७ मुली जन्मल्या. यावर्षी १ हजार मुलांमागे ९२१ मुली होत्या. तर २०१६-१७ मध्ये ५ हजार ५७२ बालकांपैकी २८९२ मुले तर २६८० मुली जन्मल्या होत्या.
यावर्षी मुलींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. २०१७-१८ मध्ये ५९३२ बालकांपैकी ३०३४ मुले तर २८९८ मुली जन्मल्या. यावर्षांत एक हजार मुलांमागे ९५५ मुली होत्या. २०१८-१९ मध्ये मुलींच्या जन्मदरात चांगलीच घसरण झाली. यावर्षी १ हजार मुलांमागे केवळ ९१० मुलीच जन्मल्या. २०१९ मध्ये एक हजार मुलांमागे केवळ ९०२ मुली जन्मल्या.
जिल्ह्यात दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घसरत चालला आहे. गत दोन वर्षांपासून या जन्मदरात सतत घट होत आहे. २०१८-१९ यावर्षी १ हजार मुलांमागे ९१० मुली होत्या तर २०१९ मध्ये १ हजार मुलांमागे ९०२ मुली होत्या. त्यामुळे या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात मुलींच्या जन्मदरात घट दिसून आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात मुलींच्या जन्मदारात वाढ करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. जर मुलींचा जन्मदर असाच घटत राहिला तर येणाºया काळात समाजाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे.

Web Title: For five years, the birth rate of girls has been declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.