फूलशेतीतून लाखोंचे शाश्वत उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:59 AM2018-07-25T00:59:41+5:302018-07-25T01:00:20+5:30
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी गणेश झोरे हे पूर्वजांची परंपरा कायम राखत फूलशेती करीत आहेत. या फूल शेतीतून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी गणेश झोरे हे पूर्वजांची परंपरा कायम राखत फूलशेती करीत आहेत. या फूल शेतीतून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
आपल्या पूर्वजांची पंरपरा कायम राखत गणेश झोरे यांनी आपल्या शेतात फुलांची लागवड केली आहे. त्यांचे पणजोबा, आजोबा व वडील हे फूलशेती करीत होते. हीच परंपरा कायम राखत त्यांनी आपल्या शेतात शेवंती, निशिगंधा, झेंडू यासह आदी फुलांची लागवड केली. या फुलांना पाणी देण्यासाठी त्यांनी ठिंबकची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, फूलशेतीसाठी खर्चही कमी लागतो. तसेच उत्पन्न जात मिळते. हे तालुक्याच्या ठिकाणी विक्रीसाठी न्यावे लागतात. या फुलांना ४० ते ५० रुपये भाव मिळत असल्याचे शेतकरी गणेश झोरे यांनी सांगितले. गणेश झोरे यांची फूलशेती व तिचे उत्पन्न पाहून परिसरातील शेतकरीही फूलशेतीकडे वळत आहे. फूलशेती करताना उत्पन्न जास्त व खर्च कमी असल्याने शेतकरी आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फूलशेती करताना दिसत आहे.