त्या ८४ शेतकऱ्यांचा अन्नपुरवठा विभागाने मागविला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:35+5:302021-01-16T04:35:35+5:30
जाफराबाद तालुक्यातील ८४ शेतकऱ्यांची शासनाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच मका खरेदी करण्यात आली होती. शेवटच्या तीन ते चार दिवसांत खरेदी ...
जाफराबाद तालुक्यातील ८४ शेतकऱ्यांची शासनाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच मका खरेदी करण्यात आली होती. शेवटच्या तीन ते चार दिवसांत खरेदी केलेल्या ८४ शेतकऱ्यांच्या २९४० क्विंटल मक्याचे ५१ लाख ७५ हजार रुपये अद्यापही मिळाले नाहीत. या सर्व शेतकऱ्यांच्या मक्याचे पैसे तत्काळ खात्यावर जमा करावे, अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. स्थानिक प्रशासनाने दखल न घेतल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. टोपे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना याबाबत माहिती दिली. भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाकडून त्या शेतकऱ्यांचा अहवाल मागविला आहे.
त्यानंतरच शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी एकनाथ शेवत्रे, राजू बोराडे, शंकर सोळंकी, आत्माराम बकाल, भगवान चव्हाण, प्रभाकर गावंडे, सुभाष दळवी, सुभाष लोखंडे, दिलीप काळे, नामदेव काळे, अनिल काळे, विनोद बोरसे, प्रमिला डोळस, शेख खाजू शेख युसुफ, परसराम ढाळे, सखाराम गावंदे, विक्रम फदाट, शे. रियाज शे. गणी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पंडित, नितीन शिवणकर, सुभाष भोपळे, ज्ञानदेव शेवत्रे, गजानन सुळ, पांडुरंग चव्हाण, विनोद खेडेकर, वामन चव्हाण, बाळू इंगळे, अर्जुन कोरडे, संजय इंगळे, शोभाबाई दाभाडे, पंडित डुकरे आदींची उपस्थिती होती.