राजुरेश्वराचा जयघोष करीत भाविकांचे पायी लोंढे राजूरच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:36 AM2018-12-25T00:36:25+5:302018-12-25T00:36:26+5:30
अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता. यामुळे चोहोबाजूंचे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
गणेशभक्तांत मंगळवारी येणाºया अंगारिका चतुर्थीचे दर्शन विशेष महत्त्वाचे मानतात. अंगारिका चतुर्थी वर्षातून एक किंवा दोन येतात. त्यामुळे मंगळवारी अंगारिका चतुर्थीचा दर्शन योग भाविकात विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यातच वर्षातील ही शेवटची अंगारकी चतुर्थी असून नाताळची सुट्टी असल्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याचा अंदाज आहे. दिवसेंदिवस मराठवाडा, खान्देश, विदर्भासह राज्याच्या कानाकोपºयातून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. या चतुर्थीला पायी येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय असते. उद्याच्या चतुर्थीसाठी आज सोमवारीच सिल्लोड, अंबड, औरंगाबाद, देऊळगाव राजा, फुलंब्री आदी मार्गावरून महिला, पुरूष, चिमुकले भाविक कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता राजूरच्या दिेशेने मार्गक्रमण करताना दिसत होते. पायी येणाºया भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटना व दानशूर मंडळींनी मोफत चहा, पाणी, फराळ, आंघोळीकरिता थंड व गरम पाण्याची सोय रस्त्यावर जागोजागी करण्यात आलेली होती. थंडीमुळे भाविकांनी दुपारपासूनच राजूरचा रस्ता धरला होता. त्यामुळे भाविकांची गर्दी राजुरात दाखल होण्यास सुरूवात झाली होती. रात्री ९ वाजता गर्दीत वाढ झाली होती. गणपती संस्थानने भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी दर्शन रांगेत कठडे, थंडी पासून बचावासाठी मंदिर परिसरात निवारा, वैद्यकीय उपचार, पिण्यासाठी पाणी, पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच महिला व पुरूष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा इ. जय्यत तयारी के ली आहे. तसेच अंगारिका चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पायी येणारे भाविक, ग्रामीण भागातून येणाºया दिंंड्या, समूहाने येणाºया भाविकांना सामान्य दर्शन रांगेतून प्रवेश देण्यात येणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.