‘फुटबॉलपटू गुणवंत; सरावाची जोड गरजेची’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:23 AM2018-10-09T01:23:22+5:302018-10-09T01:24:07+5:30
जालन्यातील शालेय फुटबॉलपटू गुणवंत असून, त्यांच्या प्रतिभेला सतत सरावाची जोड मिळाल्यास ते निश्चित चमकतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील शालेय फुटबॉलपटू गुणवंत असून, त्यांच्या प्रतिभेला सतत सरावाची जोड मिळाल्यास ते निश्चित चमकतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांनी व्यक्त केला. येथील सीपी भक्त महाविद्यालयाच्या मैदानावर नॅशनल यूथ फुटबॉल अकॅडमीच्या वतीने मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
यावेळी डॉ. प्रदीप हुशे, घनसावंगी बाजार समितीचे संचालक रावसाहेब वाघ, माजी सैनिक प्रकाश जाधव आयोजक तथा अॅकॅडमीचे प्रशिक्षक लुकस वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. अंगीरवाल यांनी फुटबॉल खेळातील अनेक तंत्र सहभागी ६५ प्रशिक्षणार्थीना समजावून सांगून प्रात्यक्षिके दाखविली. हे प्रशिक्षण शिबीर सीपी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे लुकस वाघमारे यांनी सांगितले. जालना शहरात एखाद्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षकाने येऊन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.