वन विभागास अस्वलाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:01 AM2018-03-22T01:01:50+5:302018-03-22T01:01:50+5:30

वनविभागाने दोन दिवस अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली.

Forest department could not trap bear | वन विभागास अस्वलाची हुलकावणी

वन विभागास अस्वलाची हुलकावणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : दोन दिवसांपूर्वी भोकरदन व फत्तेपूर येथे अस्वलाने हल्ला करून तीन जणांना जखमी केल्यानंतर अस्वलाचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या वनविभागाने दोन दिवस या अस्वलाची शोध मोहीम हाती घेतली, मात्र २१ र्माच रोजी दुपारी २ वाजे पर्यंत अस्वलाचा शोध लागला नसल्याने ही त्यामुळे शोध मोहीम थांबविली. अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीना वनविभागाच्या वतीने औषधोपचारासाठी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजाराचे धनादेश दिले.
२० मार्च रोजी शहरात व फत्तेपूर शिवारात अस्वलाने अचानक येऊन नागरीकावर हल्ला केला. जंगलातून भरकटलेले हे अस्वल शहरातील धनगरवाडी शिवारात आले होते, त्याने आकाश सपकाळ वय १७ वर्ष याच्यावर अचानक झडप घालून त्याला जखमी केले. त्यानंतर नागरीकानी अस्वलाला हुसकाऊन लावल्याने हे अस्वल जोमाळा व फत्तेपूर शिवारात गेले फत्तेपूर शिवारातील गणेश गायकवाड यांच्या गट क्रमांक ३५ मधील शेतात शुभम संजय गायकवाड यांच्यावर हल्ला करून जखमी केले, तर याच गावातील सारंगधर तळेकर यांच्या गट क्रमांक १६९ या शेतात हौदाजवळ उभ्या असलेल्या रूख्मणबाई सारंगधर तळेकर यांच्यावर हल्ला करून पळ काढला. मात्र याच वेळी गावातील शंभर ते दीडशे नागरीक या अस्वलाचा पाठलाग करीत होते, त्यामुळे हे अस्वल मिळेल त्या दिशेने पळत होते. अस्वलाला पकडण्यासाठी वनविभागाचे १८ कर्मचाऱ्यांचे पथक आले होते, त्यांनी अस्वल पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. बुधवारी जालना येथील सहायक वनसंरक्षक जी़एम़शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन जखमीची विचारपूस करून मदतीचे धनादेश दिले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय दोडके वनपाल डी़सी़जाधव, एस़जी़ गाडेकर यांची उपस्थिती होती.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही जखमीचा पूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.
भोकरदन व फत्तेपूर शिवारात अस्वलाने हल्ला करून तीन जणाना जखमी केल्यामुळे दोन दिवसा पासून भोकरदन शहरासह फत्तेपूर, गारखेडा, जोमाळा, मासनपूर, चौ-हाळा, बाभुळगाव, कोदोली या गावात अस्वलाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. २१ मार्च रोजी या सात गावातील शेतकरी अथवा शेतमजुर शेताकडे फिरकलाच नाही जणावराना चारा पाणी करण्यासाठी सुध्दा चार ते पाच जणाच्या जथ्थ्याने जात होते.

Web Title: Forest department could not trap bear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.