जालन्यात हद्दपार आरोपीसह चारजण अटकेत; कारसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:56 PM2019-09-23T14:56:08+5:302019-09-23T14:58:13+5:30

हद्दपार आरोपीसह चौघे जेरबंद

Four arrested in Jalna with extortion accused; Seizure of goods with car seized | जालन्यात हद्दपार आरोपीसह चारजण अटकेत; कारसह मुद्देमाल जप्त

जालन्यात हद्दपार आरोपीसह चारजण अटकेत; कारसह मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देतीन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली

जालना : चोरी, घरफोड्यातील हद्दपार आरोपीसह चार जणांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि.२३ )  सकाळी जालना शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या कारसह १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जालना शहरासह परिसरातील घरफोड्या, चोऱ्यांमधील आरोपी शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे आल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी दुपारी कारवाई करून गजानन सोपान सिगाडे (रा. पांचनवडगाव ता.जालना), हद्दपार असलेला हरदिपसिंग बबलूसिंग टाक (रा.गुरूगोविंदसिंग नगर, जालना), दियासिंग बरिहामसिंग कलानी (रा. हिन्दनगर जालना) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्या तिघांकडे चौकशी केल्यानंतर तीन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून देऊळगाव राजा येथून चोरलेली विना नंबरची एक कार, कटर, टामी, हातोडी व इतर असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ललूसिंग जिलेसिंग कलानी (रा. जालना) याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, नंदकिशोर कामे, पोकॉ संदीप चिंचोले, राजू पवार, आकाश कुरील, विजय निकाळजे, श्रीकुमार आडपे यांच्या पथकाने केली.

टाक दोन वर्षासाठी हद्दपार
एडीएसच्या पथकाने जेरबंद केलेला आरोपी हरदिपसिंग बबलूसिंग टाक हा दोन वर्षासाठी जालना, औरंगाबाद व बुलढाणा या जिल्ह्यातून हद्दपार आहे. शिवाय त्याच्याविरूध्द विविध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

इतर आरोपींवर अनेक गुन्हे
एडीएसने पकडलेल्या गजानन सिगाडे याला नगर पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्याच्याविरूध्द चोरी, घरफोडीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. दियासिंग कलानी, ललूसिंग कलानी या दोघांविरूध्दही चोरी, घरफोडीसह इतर गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी आहे.

Web Title: Four arrested in Jalna with extortion accused; Seizure of goods with car seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.