गावठी कट्ट्यासह चार काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:57 AM2018-04-29T00:57:08+5:302018-04-29T00:57:08+5:30
बनावट नोटा प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या संशयिताकडून शनिवारी अंबड येथील राहत्या घरातून गावठी कट्ट्यासह चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बनावट नोटा प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या संशयिताकडून शनिवारी अंबड येथील राहत्या घरातून गावठी कट्ट्यासह चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
विशेष कृती दलाच्या पथकाने संशयित शेख समीर शेख मुन्ना (२३,रा.शारदानगर, अंबड) यास कारमधून सहा लाख १७ हजारांच्या बनावट नोटासह गोलापांगरी येथून मंगळवारी ताब्यात घेतले होते. सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. चौकशीत संशयिताकडे एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून गावठी कट्टा व काडतुसे जप्त केली. हे साहित्य त्याने कुणाकडून व कशासाठी घेतले, बनावट नोटा कुणाकडनू आणल्या, त्याचा कुठे वापर केला याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कृती दलाचे यशवंत जाधव, एम.बी. स्कॉट, फुलचंद हजारे, मारोती शिवरकर, एन. बी. कामे, गणेश जाधव यांनी ही कारवाई केली.