चार दिवसाचे अर्भक शेतात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:48 AM2019-08-07T00:48:19+5:302019-08-07T00:48:40+5:30

पिंपळखुटा येथे धामना नदीच्या पुलाजवळील सोयाबीनच्या शेतात मंगळवारी पहाटे चार दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.

Four-day-old infants were found in the field | चार दिवसाचे अर्भक शेतात आढळले

चार दिवसाचे अर्भक शेतात आढळले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : तालुक्यातील पिंपळखुटा येथे धामना नदीच्या पुलाजवळील सोयाबीनच्या शेतात मंगळवारी पहाटे चार दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यावर जाफराबाद ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय (जालना) येथे अर्भकास दाखल केले आहे.
जाफराबाद- चिखली मार्गालगत तीन किमी. अंतरावर पिंपळखुटा गावाजवळ प्रकाश दूनगहू यांचे शेत आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रा. निवृत्ती बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पंडित, उत्तम उगले, राधेश्याम घोरपडे, रामभाऊ शिराळे, उत्तम दूनगहू, विलास खंबाट हे मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान दूनगहू यांच्या सोयाबीनच्या शेतालगत लहान बाळ रडत असल्याचा आवाज मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तिंना आला. त्यांनी प्रत्यक्षात खात्री केली असता स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देवून अर्भकास जाफराबाद ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.
त्यावर वैदकीय अधिकारी डॉ. निलेश पुरी, डॉ. कदम, कृष्णा वानखेडे, रीना सोळंके यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलिसांच्या ताब्यात देऊन या मुलीस जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात मातेविरूद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात मातेचा शोध घेत असल्याची माहिती पोनि. शिरीष हुंबे यांनी दिली.

Web Title: Four-day-old infants were found in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.