सिलिंडरच्या स्फोटात चार घरे बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:48 IST2019-12-18T00:47:47+5:302019-12-18T00:48:00+5:30
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरांना आग लागल्याची घटना अंबड तालुक्यातील मसई तांडा येथे मंगळवारी दुपारी घडली

सिलिंडरच्या स्फोटात चार घरे बेचिराख
लोकमत न्यूज नेटवर्क
मठपिंपळगाव : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरांनाआग लागल्याची घटना अंबड तालुक्यातील मसई तांडा येथे मंगळवारी दुपारी घडली. या आगीत जवळपास २० ते २२ लाखांचे नुकसान झाले आहे.
या आगीत जीवनावश्यक वस्तूंसह सोने-चांदी, रोख रक्कम जळून खाक झाली आहे. मसई तांडा येथील भानुदास भाऊसिंग शेलार यांच्या घरातील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. शेजारील परमेश्वर शेलार, मदन गायकवाड, मंगेश गायकवाड यांच्याही घरांना आगीने घेरले.
या स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य, कपडे, सोने-चांदी दागिने, अन्नधान्य व रोख रक्कम असे प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.