जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:14 AM2019-11-13T00:14:18+5:302019-11-13T00:14:54+5:30

गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

Four hundred crores hit Jalna district | जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा कहर : अहवाल आयुक्तांकडे सादर, सोयाबीन, मका, कपाशीचे नुकसान

जालना : आधी पाऊस पडावा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना याच परतीच्या पावसाने डोळ्यात अश्रू आणले ओहत. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवाला आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे सुपूर्द केला असून, त्यात सोयाबीनसह. मका, कपाशीसह द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.
३१ आक्टोबरला संपलेल्या पावसाळ्यात केवळ ५८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही भोकरदन आणि जाफराबाद हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. परंतु दसरा ते दिवाळी आणि त्या नंतर पडलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. सोयाबीन, मका आता बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील असे स्पप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पंचनामे होऊन नुकसान भरपाईचे क्षेत्र आणि आकडे निश्चित झाले आहेत. ही आकडेवारी जुन्याच निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे यात वाढ झाल्यासच खºया अर्थाने शेतकºयांना मदत मिळू शकते. सध्या आपत्तीच्या जुन्याच निकषानुसार मदतीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. हे पंचनाम्यांचे आकडे तयार करतांना महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची खºया अर्थाने कसोटी लागली. दोनवेळेस बैठका घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना अहवालाची माहिती आणि एक प्रत देण्यात आली. त्यावेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी रणदिवे आदींची उपस्थिती होती.
सत्तासंघर्ष : मदतीकडे लक्ष लागून
जालना जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवालही शासनाकडे गेला आहे. परंतु सध्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या गंभीर प्रश्नावर लक्ष देण्यासासाठी ना सत्ताधाºयांना वेळ आहे,
ना विरोधकांना त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरच काही अधिकाºयांनी शेतकºयांबद्दल तळमळ दाखवली तरच ही मदत लवकर मिळू श्कते. नसता, मदत प्रत्यक्षात कधी मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Four hundred crores hit Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.