खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:36 AM2019-01-12T00:36:03+5:302019-01-12T00:38:02+5:30

पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले.

Four suspension giving false information | खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन

खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : २ तलाठी, २ ग्रामसेवकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले. ते टंचाई आढावा बैठकीसाठी भोकरदन येथे गेले होते.
बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली भोकदन आणि जाफराबाद दुष्काळ आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी जि.पच्या मुुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचीही प्रमुुख उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाºयांनी अत्यंत शिस्त बध्द पध्दतीने तपासिलवर माहिती अधिकाºयांकडून जाणून घेतली. याप्रसंगी काही अधिकाºयांनी दिशाभूल करणारी माहिती सादर केली. अशा कर्मचाºयांची चांगलीच कानउघडणी जिल्हाधिकारी केली.
या बैठकीत शिरसगाव मंडप व पोखरी या गावाचे ग्रामसेवक आशा सोनुने, जी. जे. मिसाळ तसेच तलाठी ठुबे, के. टी. सोनवणे यांनी टँकर पुरवठ्या बाबत खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, भोकरदन गटविकास अधिकारी डॉ. अरुण चौलवाल, तहसीलदार संतोष गोरड, जाफराबादचे तहसीलदार जे. डी. वळवी आदी उपस्थित होते.

Web Title: Four suspension giving false information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.