शेतकरी दाम्पत्यासह चौघांना चोरट्यांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:04 AM2019-10-17T01:04:42+5:302019-10-17T01:05:03+5:30
चोरट्यांनी शेतकरी दाम्पत्यासह चौघांना मारहाण करीत दोन ठिकाणांहून १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : चोरट्यांनी शेतकरी दाम्पत्यासह चौघांना मारहाण करीत दोन ठिकाणांहून १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली.
बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गट क्र १७९ मधील एका महाविद्यालयातील सुपरवायझर व वॉचमन या कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून चोरट्यांनी मारहाण केली. त्यावेळी आठ हजार रूपयाचा एक मोबाईल, रोख ७०० रूपये व एका डायनुमातील १८०० रूपयांची ६ किलो तांब्याची तार चोरून नेली. तसेच जवळच असलेल्या एका शेतातील पांडुरंग सुखदेव खिल्लारे व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यांच्या पत्नीच्या गळयातील साडेसात हजार रूपयांचे तीन ग्रॅमचे मणीमंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी अनिल गंगाधर कोळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार पोहेकॉ नरवडे यांनी दिली़ दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
टॉवरच्या २४ बॅट-या लंपास; बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना : चोरट्यांनी एका खाजगी कंपनीच्या टॉवरवरील २४ हजार रूपये किंमतीच्या २४ बॅटºया लंपास केल्या. ही घटना मंगळवारी रात्री अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील टावर परिसरात घडली असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील चिंचखेड शिवारात एका खाजगी कंपनीचा टॉवर आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी या टॉवरच्या सेल्टरच्या पाठीमागील पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केला.
आतील २४ हजार रूपये किंमतीच्या २४ बॅट-या हातोहात लंपास केल्या. या प्रकरणी योगेश उखाजी इंगळे (रा. गोळेगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नापोकॉ सोनवणे हे करीत आहेत.