चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:21 AM2019-05-20T00:21:53+5:302019-05-20T00:22:11+5:30

मंठा रोडवरील देवगाव फाट्याजवळील गुरुद्वारासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन दुचाकी, एक पिकअप व एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Four vehicles accident; Two people killed | चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार

चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : मंठा रोडवरील देवगाव फाट्याजवळील गुरुद्वारासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन दुचाकी, एक पिकअप व एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पांडुरंग तुळशीराम शिंदे (२५, रा. कुंभारी ता.सेलू) व बापूराव शेषराव खराबे (६५ रा. हेलस, ता. मंठा) असे मयतांची नावे आहे.
नांदेड -जालना महामार्गावरील देवगाव फाट्याजवळ पांडुरंग शिंदे व बापूराव खराबे दुचाकी क्र. (एमएच. ३८. ए. ६७९३) ने मंठ्याकडे जात असतांना जिंतूरकडून येणाऱ्या पिकअपने क्रं (एमएच. २२. बीएच. २०९७) दुचाकीला धक्का दिला. पिकअपच्या पाठीमागून येत असलेल्या दुचाकीने शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली.
यामुळे पाठीमागून येणाºया ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार पांडूरंग शिंदे, बापूराव खराबे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या दुचाकीवरील वसंत चव्हाण हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नवनाथ लोखंडे, शिवाजी गिरी यांनी वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या अपघातामुळे मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
शिर्डी येथील घटना : खामखेडच्या तरुणाचा पाय-यावरून पडून मृत्यू
राजूर : शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील तरूणाचा पाय-या उतरतांना खाली कोसळून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.
खामखेडा येथील कृष्णा विठ्ठल नागवे (२४) हा गावातील आठ ते नऊ मित्रासंह शुक्रवारी सायकाळी जीपने शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री त्यांनी शिर्डीत खाजगी लॉज करून आराम केला.
सकाळी झोपेतून ऊठल्यानंतर खाली पायºया उतरतांना पायऱ्यांचा अंदाज न आल्याने कृष्णा जिन्यातून खाली कोसळला. त्यातच त्याच्या मेंदूला जबर मार लागल्याने बेशुध्द पडला. बेशूध्दावस्थेत त्याला साईबाबा देवस्थानच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पं. स. उपसभापती गजानन नागवे यांच्यासह नातेवाईकांनी शिर्डीकडे धाव घेतली.

Web Title: Four vehicles accident; Two people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.