फेसबुकच्या माध्यमातून ओढले जाळ्यात; १ किलो सोन्याचे नाणे देतो सांगून १० लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:34 PM2022-07-12T13:34:21+5:302022-07-12T13:35:48+5:30
शेतामध्ये खोदकाम करताना सोन्याची नाणी भरलेला एक हंडा सापडला असल्याची सांगून फसवणूक
परतूर ( जालना): मला शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. यातील एक किलो सोने दहा लाख रुपयात देतो म्हणून नकली सोने देऊन दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परतूर पोलिसात तिघा जणांविरोधात करण्यात आला आहे.
फेसबुकवर एका पंधरा वर्षाच्या मुलाशी मैत्री करून शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. तुलाच कमी पैशात देतो असे सांगितले. ही सर्व हकीकत मुलाने घराशेजारी राहणार्या व्यक्तिला सांगितल्यानंतर कमी पैशात सोने मिळत असल्याच्या आमिषातून दोघामित्रांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात दि. ११ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख रावसाहेब लांब रा. तांबवा ता. केज.जि.बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील शेजारी राहणारा मुलगा महादेव कोल्हे ( १५ ) हा एप्रिल महिन्यात एक दिवशी येऊन म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवरुन एक मित्र झाला आहे. त्याला शेतामध्ये खोदकाम करताना सोन्याची नाणी भरलेला एक हंडा सापडला असून विकायचा आहे. तुला खुप कमी किंमतीत देईल तू एकदा परतूर रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ येऊन सोने पाहून एक नमुना दाखविण्यासाठी घेवून जा, असे फोनकरून सांगत आहे.
त्यानंतर महादेवकडून काही फोन नंबर घेतले. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन पाहिला असता, त्यांनी परतूर रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ येण्यास संगितले. दि २३ एप्रिल २०२२ रोजी केजवरुन दोघे जन मित्र कारने परतूर येथे रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्याकडे एक सोन्याचे नाणे सम्पल दाखविले ते खरे वाटले व त्यानंतर त्यांना म्हणालो की, चला आपण रेल्वे गेटजवळ ज्यूस घेऊ. यावेळी त्याने शामराव पवार असे नाव सांगितले. सोबत पत्नी व मुलगा असल्याचे सांगून शेतामध्ये खोदकाम करित असताना एक सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यामधील काही एक कळत नसुन आम्ही गरीब आहोत. पोलीसाची भिती वाटत असल्यामुळे जास्त कोणी ओळखीचे लोक नाही. गावातील महादेव कोल्हे हा फेसबुकचा चांगला मित्र असल्यामुळे तुम्हालाच सोने विकायचे आहे. किती सोने विकत घेणार आहे असे बोलल्यानंतर त्यांना एक किलो सोने विकत घ्यायचे आहे. दहा लाख रुपये तुम्हाला देवू असे बोलल्यानंतर त्यांनी
त्यांच्याकडील एक सोन्याचे एक ग्रमचे नाणे तपासणीसाठी दिले. ते घेवून गावातील सोन्याच्या दुकानदाराकडे घेवून त्याची साहनिशा केली. खरे असल्याचे समजल्याने त्यांना परत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यांना कळविले की, दि ४ मे रोजी रोजी सोने घेण्यासाठी येत आहोत असे त्याना फोनवर कळविले. दोघे मित्र कारने परतुर रेल्वे गेटच्या जवळ आल्यावर संपर्क केला असता त्यांनी मुलगा वाटुर रस्त्याला सोने घेवून थांबला आहे. तेथे जावू असे म्हणून ते दोघे जण पतीपत्नी असे वाटूर रस्त्यावर एका पुलाजवळ गेलो.
तेथे एक मुलगा एका झाडाखाली बसलेला दिसल्यानंतर एका शेतामध्ये नेले. एका बॅगमध्ये असलेले सोने दाखविले. त्यांना दहा लाख रुपयाची जमवाजमव झाली नाही. एक लाख रुपयाचे सोने दया असे बोलल्यानंतर त्यांनी सोने देण्यास नकार दिला. घ्यायचे असले तर एक किलो सोने घ्या असे बोलल्यानंतर तेथुन जाण्यासाठी निघालो असता त्यांनी थांबवुन सध्या इसार म्हणुन दहा हजार रुपये दया असे बोलले. त्यावेळी त्यांना इंसार म्हणुन दहा हजार रुपये दिले. परत गावी तांबवा येथे आलो. दोन दिवासामध्ये दहा लाखांची जमवाजमव करून पैसे घेऊन सोने विकत घेण्यासाठी येत असल्याचे कळविले.
दि. ७ मे रोजी २०२२ रोजी कारने परतुरमध्ये आल्यावर त्यांनी वाटुर फाटा येथे या असे बोलल्यानंतर तेथे गेलो असता त्यांने वाटुर फाटा मंठा रोडजवळच नेले. त्यांच्या कडील असलेले सोने दाखविले. दहा लाख रुपये घेऊन तेथून निघून गेले. ते दिलेले सोने दुस-र्या दिवशी सोनाराकडे दाखविले असता सर्व खोटे असल्याचे सांगितले. हे ऐकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांना मोबाईल वर संपर्क केला असता त्यांचे फोन बंद येत होते. फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्या तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला असता काही पत्ता लागला नाही. या प्रकरणी गोरख लांब यांच्या फिर्यादी वरुण शामराव पवार त्यांची पत्नी व मुलगा रा. खुरानपुर ता.लोणार यांनी दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे हे करीत आहेत.