लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक

By दिपक ढोले  | Published: July 28, 2023 07:58 PM2023-07-28T19:58:07+5:302023-07-28T19:58:13+5:30

पुढील तपास पोलिस निरीक्षक शालिनी नाईक या करीत आहेत.

Fraud of two lakhs by pretending to marry a young woman | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक

googlenewsNext

जालना: पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून साहित्य खरेदीसाठी ऑनलाइन पावणेदोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तरुणीने सायबर ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२१ वर्षीय तरुणीची अमनप्रीतसिंग (पूर्ण नाव पत्ता नाही) नावाच्या व्यक्तीसोबत ऑनलाइन ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर संशयिताने लग्नाचे आमिष दाखविले. संबंधित तरुणीला लग्नाचे साहित्य खरेदी करून कुरिअरद्वारे पाठविले आहे, असे सांगून तरुणीकडून ऑनलाइन पद्धतीने एक लाख ७१ हजार ९९८ रुपये घेतले. संशयितासोबत वारंवार संपर्क करूनही साहित्य न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात झाले. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून सायबर ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक शालिनी नाईक या करीत आहेत.

Web Title: Fraud of two lakhs by pretending to marry a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.