जालना जिल्ह्यात १ लाख पाठ्यपुस्तकांचे होणार मोफत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:06 AM2019-06-12T00:06:02+5:302019-06-12T00:06:30+5:30

शासनाच्या सर्वशिक्षा अभियान, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख २ हजार २२५ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशीच करण्यात येणार आहे.

Free Distribution of 1 lakh textbooks in Jalna district | जालना जिल्ह्यात १ लाख पाठ्यपुस्तकांचे होणार मोफत वितरण

जालना जिल्ह्यात १ लाख पाठ्यपुस्तकांचे होणार मोफत वितरण

Next
ठळक मुद्देशाळेच्या पहिल्या दिवशी : १९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके

जाफराबाद : शासनाच्या सर्वशिक्षा अभियान, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख २ हजार २२५ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशीच करण्यात येणार आहे.
याची तयारी पूर्ण झाली असून यापूर्वी उपलब्ध पाठ्यपुस्तकांचे वितरण केंद्रस्तरावर करण्यात येऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना पुस्तके देण्यात आले आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात अभ्यासक्रमाचे पुस्तक मिळायला पाहिजे, या दृष्टीने गटसाधन कार्यालयाने नियोजन केले असून उपलब्ध पाठ्यपुस्तके येत्या दोन दिवसात प्रथम केंद्र स्तरावर व नंतर शाळा प्रमुखांकडे सोपविण्यात येणार आहेत.
जाफराबाद तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५० शाळा कार्यरत आहेत. यात खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळाची संख्या ही ३७ आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य- पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या वर्गाच्या खेळू करू शिकू या पासून ते इंग्रजी, गणित, विज्ञान, भूगोल, या विषयाचे ११ हजार ९९०, वर्ग दुसरा १० हजार ९९०, वर्ग तिसरा ८ हजार ५६०, वर्ग चौथा ९ हजार १७५, पाचवी १२ हजार ८५०, सहावी १६ हजार १००, सातवी १२ हजार ५५०, आठवी १६ हजार ७१० या प्रमाणे जवळपास ८५ टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. तसेच यंदा सर्व शाळांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके वाटप करण्यात यावे, यासाठी जि. प. तर्फे नियोजन करण्यात आले आहे.
पहिली ते आठवी वर्गात लाभार्थ्यांची संख्या
पहिल्या वर्गात २ हजार २५०, दुसरा २ हजार १६०, तिसरा २ हजार ९५, चौथी २ हजार २४५, पाचवी २ हजार ६६०, सहावी २ हजार ५६०, सातवी २ हजार ५७५, आठवी २ हजार ६५० आहे.
या कामी गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खरटमल, जगन वाघ, नारायण पिंपळे, विश्वजीत निकम हे काम पाहत आहे. उर्दू आणि सेमी माध्यमाचे पाठ्य- पुस्तक अद्याप प्राप्त असून सदरील पुस्तके प्राप्त होताच वाटप करण्यात येईल असे गट शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शिवाजी फोलाने यांनी सांगितले.

Web Title: Free Distribution of 1 lakh textbooks in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.