रोटरी क्लबतर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:06 AM2020-01-17T01:06:38+5:302020-01-17T01:07:04+5:30
रोटरी क्लब आॅफ जालनातर्फे गेल्या १६ वर्षापासून फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू, चिकटलेली बोटे, जळाल्यानंतर हाता पायाला आलेले व्यंग इ. वर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया केली जाते
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रोटरी क्लब आॅफ जालनातर्फे गेल्या १६ वर्षापासून फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू, चिकटलेली बोटे, जळाल्यानंतर हाता पायाला आलेले व्यंग इ. वर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जर्मनी येथील तज्ज्ञ डॉक्टर मिशन हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया करतात.
यंदा या शिबिराचे हे १७ वे वर्ष आहे. खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च येतो. परंतू रोटरी क्लबच्या माध्यमातून या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी होणे आवश्यक असते.
ही तपासणी झाल्यानंतरच कुठल्या रुग्णांवर कुठली शस्त्रक्रिया करायची याचा निर्णय घेतला जातो. त्यासाठी ही प्राथमिक तपासणी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ नंतर मिशन हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे.
याचा लाभ संबंधित रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदेश सकलेचा, सचिव डॉ. विजय जेथलिया तसेच मिशन हॉस्पिटलचे डॉ. क्रिस्टोफर मोजेस, डेव्हिड गायकवाड यांनी केले आहे.