जालना नगर पालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:23 AM2019-08-22T00:23:01+5:302019-08-22T00:24:08+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला.
शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी या भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेषत: सिध्दार्थ नगर, योगेश नगर, जगदेश्वर नगर व इतर भागातील रस्ता, नाल्यांची अवस्था बिकट हो. या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही कामे झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शहरातील विविध मार्गावरून काढलेला मोर्चा पालिकेत धडकला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर कदीम पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चात फकिरा वाघ, राहूल सावळे, बाजीराव लंगोटे, सुलोचनाबाई गायकवाड, अक्षय आटोळे, सोजरबाई फंदे, सुमनबाई पांचाळ, कामिनाबाई हलगे यांच्यासह महिलांसह युवकांचा लक्षणीय सहभाग होता. या भागाला सोयी-सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा मुख्याधिकारी, नगरसेवकाविरूध्द जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले.