फळपिकांना विमा योजना लागू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:18 AM2019-11-02T00:18:57+5:302019-11-02T00:19:27+5:30

आंबे बहरासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा लागू करण्यात आली आहे.

Fruit insurance scheme applied to ... | फळपिकांना विमा योजना लागू...

फळपिकांना विमा योजना लागू...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आंबे बहरासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा लागू करण्यात आली आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पिकांचा विमा वेळेत भरावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना २०१९- २० आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली आहे. यात संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, द्राक्षे या फळ पिकांचा समावेश आहे. एकूण २० हेक्टर व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाºया सर्व महसूल मंडळांत ही योजना राबविण्यात येत आहे. कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरांमध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. मात्र, फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो, हीच बाब विचारात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी फळपिकांचा विमा प्रस्ताव ७ नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Fruit insurance scheme applied to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.