बदनापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:31 AM2018-01-19T00:31:55+5:302018-01-19T00:32:17+5:30

विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे दिली.

Funding for the development of Badnapur will not be reduced | बदनापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

बदनापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/बदनापूर : जालना लोकसभा मतदारसंघातील बदनापूर तालुक्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध विकासकामासाठी भरीव निधी दिला असून, यापुढे विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे दिली.
बदनापूर तालुक्यातील मौजे वाकुळणी ते रोहिलागड रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी, शेलगाव येथे महादेव-मारोती मंदिर समोर सभागृहाचे भूमिपूजन, वाकुळणी येथील काशिगिरी महाराज संस्थानात धार्मिक व पर्यटन विकास योजनेंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन, सिमेंट रस्ता भूमिपूजन पेव्हर ब्लॉक व सभागृहाचे बांधकाम एकूण निधी २५ लाख व देवपिंपळगाव येथील सभागृहाचे भूमिपूजन ७ लाख इ. विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा खा. दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.नारायण कुचे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हा सरचिटणीस बद्रीनाथ पठाडे, तालुकाध्यक्ष वसंत जगताप, अवधूत खडके, अनिल कोलते, हरिचंद्र शिंदे, पद्माकर जºहाड, सत्यनारायण गिल्डा, भगवान म्हात्रे, शरद अवघड उपस्थित होते.
खा.दानवे म्हणाले की, तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी भरीव निधी केंद्र व राज्य शासनातर्फे दिला असून या पुढेही बदनापूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.

Web Title: Funding for the development of Badnapur will not be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.