जवान गणेश फदाट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:58+5:302021-01-23T04:31:58+5:30
बोरगाव फदाट ; ‘अमर रहे, अमर रहे शहीद गणेश फदाट अमर रहे’च्या घोषणा जाफराबाद : तालुक्यातील बोरगाव फदाट ...
बोरगाव फदाट ; ‘अमर रहे, अमर रहे शहीद गणेश फदाट अमर रहे’च्या घोषणा
जाफराबाद : तालुक्यातील बोरगाव फदाट येथील शहीद जवान नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे शहीद गणेश फदाट अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
गुरुवारी सकाळी सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने गणेश फदाट यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव गुरुवारी रात्री विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. शुक्रवारी बोरगाव फदाट येथे लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. मारुती मंदिरासमोर अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम, ‘अमर रहे... अमर रहे... शहीद जवान अमर रहे’, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सैन्य दलातील सुभेदार बाळासाहेब बोरकर, वीरपिता श्रीराम फदाट, वीरमाता फदाट, वीरपत्नी अंजली फदाट, प्रेम फदाट, दिनेश फदाट, जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, तहसीलदार सतीश सोनी, स.पो.नि. अभिजित मोरे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक मुठ्ठे, जि.प. सदस्य संतोष लोखंडे, सुधाकर दानवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बजरंग बोरसे, दीपक बोऱ्हाडे, राजेश म्हस्के, जि.प सदस्य केशव जंजाळ, हभप ज्ञानेश्वर माऊली, हभप प्रदीप महाराज, तुकाराम फदाट, कैलास जाधव, मार्तंड फदाट, ग्रामसेविका आर.जी. लांडगे, एकनाथ शेवत्रे, विनोद खेडेकर यांची उपस्थिती होती. शहीद नाईक सुभेदार गणेश फदाट यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.