तणाव मुक्तीसाठी खेळ महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:58 PM2017-11-30T23:58:13+5:302017-11-30T23:58:17+5:30

जालना : तणावापासून मुक्तीसाठी खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळाडूंनी जय, पराजयाची तमा न बाळगता खिलाडू वृत्तीचे दर्शन ...

Game is important for stress relief | तणाव मुक्तीसाठी खेळ महत्त्वाचा

तणाव मुक्तीसाठी खेळ महत्त्वाचा

googlenewsNext

जालना : तणावापासून मुक्तीसाठी खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळाडूंनी जय, पराजयाची तमा न बाळगता खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तीन दिवसीय विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पधेर्चे उद्घाटन गुरुवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. चे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. राजेश टोपे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, बीडचे एम.डी. सिंह, लातूरचे जी. श्रीकांत, औरंगाबादचे नवलकिशोर राम, परभणीचे पी. शिवशंकर, हिंगोलीचे अनिल भंडारी, नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त साज्ञा सावरकर, एसआरपीचे समादेशक भारत तांगडे, आरपीटीएसचे प्राचार्य पवार, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांची उपस्थिती होती.
 तीन दिवस चालणा-या या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ४० क्रीडा प्रकारात खेळाडू क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. लोणीकर म्हणाले की, कामातील शारीरिक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी, पुन्हा उत्साह- चैतन्य-आनंद निर्मितीसाठी क्रीडा व सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी महसूल विभागावर असून, विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. भापकर म्हणाले की, तणावापासुन मुक्तीसाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा अत्यंत उपयुक्त आहेत. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेमध्ये आठही जिल्ह्यांतील २ हजारांपेक्षा अधिक खेळाडू ४० क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोबाईल अप विकसित केले असून या माध्यमातून या स्पर्धेचे नियोजन तसेच माहिती  उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटविण्यात आली. आठही जिल्ह्यातून आलेल्या संघाच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संचलनाच्या स्पर्धेत बीड जिल्ह्याने प्रथम, औरंगाबादने द्वितीय तर जालना जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला. यानंतर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी आभार मानले.

Web Title: Game is important for stress relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.