अंबड नगर पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:17 AM2018-10-18T00:17:57+5:302018-10-18T00:18:44+5:30
अंबड पालिकेच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे त्रासलेल्या शहरातील व्यापाºयांनी बुधवारी अनोखी गांधीगिरी करत टँकरव्दारे रस्त्यावर पाणी शिंपडुन पालिकेच्या डोळयात झणझणीत अंजन घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : अंबड पालिकेच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे त्रासलेल्या शहरातील व्यापाºयांनी बुधवारी अनोखी गांधीगिरी करत टँकरव्दारे रस्त्यावर पाणी शिंपडुन पालिकेच्या डोळयात झणझणीत अंजन घातले.
मत्स्योदरी देवी परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेत संपूर्ण मराठवाडा व विदर्भातून भक्तांची अलोट गर्दी दर्शनासाठी लोटते. नवरात्रीनिमित्त भाविकांना रस्त्यावरील खड्डयांचा त्रास होऊ नये याकरिता पालिकेच्या वतीने शहरातील खड्डे भरण्यात आले. मात्र खड्डे भरताना मुरुम वापरण्याचे बंधन असतानाही पालिकेतील काही अवलिया कंत्राटदार पदाधिकाºयांनी मुरुमाऐवजी माती भरल्याने शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले. मागील सात दिवसांपासून शहरातील व्यापारी, देवी भक्त व सामान्य नागरिक धुळीच्या त्रासाने वैतागले. ज्या व्यापाºयांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती त्या व्यापाºयांची गत या सर्व प्रकारामुळे भिक नको पण कुत्रं आवर या म्हणीप्रमाणे झाली.
शहरातील कोर्ट रोड भागासह इतर भागातील व्यापाºयांनी रस्त्यावरील खड्डयांचा रहदारीला त्रास होत असुन नवरात्रीनिमित्त रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. पालिका प्रशासनाने व्यापाºयांच्या मागणीची दखल घेत तसेच भाविकांच्या भावनांचा विचार करुन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला तत्काळ सुरुवात केली. मात्र रस्त्यांची डागडुजी करताना खड्डे भरताना मुरुम वापरण्याऐवजी पालिकेतील काही महाभाग कंत्राटदार पदाधिकाºयांनी मुक्तहस्ते मातीचा वापर सुरु केला. मातीमुळे रस्त्यावरील खड्डे तर भरल्या गेले, मात्र दुकानांमध्ये सगळीकडे धुळच धुळ झाली. विशेष म्हणजे रस्त्यावरील धुळीमुळे सामान्य नागरिकांच्या डोळयात, नाकात माती जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला. या सर्व प्रकाराने मेटाकुटीला आलेल्या व्यापाºयांनी पालिकेला बुजविलेले खड्डे पुन्हा पहिल्यासारखे करुन द्या, खड्डयातील माती काढून घ्या, अशी विनंती केली.
बुधवारी कोर्ट रोड परिसरातील शंकर ढेरे, प्रितम बाकलीवाल, पांडुरंग शिंदे, गणेश वाघ, पियुष चांदीवाल, ज्ञानेश्वर मिंधर, योगेश लाहोटी, अशोक खरात, सुशिल पाटणी, दत्ता वावरे, संतोष तंगडपल्ली, सुरेश तंगडपल्ली आदी व्यापाºयांनी एकत्र येऊन स्वखर्चाने पाण्याचे काही टँकर मागविले व संपुर्ण रस्त्यावर पाणी शिंपडुन तात्पुरत्या स्वरुपात का होईना धुळीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला.