गटविकास अधिकारी तांगडेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:02 AM2019-03-31T00:02:20+5:302019-03-31T00:02:39+5:30

परतूर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्यावर सिंचन विहिरी वाटपात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला

Gang Development Officer Tangade | गटविकास अधिकारी तांगडेवर गुन्हा

गटविकास अधिकारी तांगडेवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्यावर सिंचन विहिरी वाटपात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
परतूर तालुक्यात पंचायत समिती मार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१७, २०१८ व २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ५६२ विहिरींचे उद्दिष्ट दिलेले होते. मात्र, १५८९ अधिकच्या म्हणजे एकूण २१५१ विहिरी वितरित करण्यात आल्या. तसेच गटविकास अधिकारी तांगडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौजे शेवगा येथे ११ सिंचन विहिरी बनावट कागदपत्रे तयार करून नियमानुसार मंजुरी न घेता हजेरी पत्रक तयार करून पैसे वाटप केले. विहीर मंजूर करताना नियमानुसार कार्यवाही न करता, इतरांचे अधिकार स्वत:च वापरणे, प्रशासकीय मान्यता आपल्या अधिकारात देऊन खोटी कागदपत्रे तयार करून १३ लाख ६ हजार ३०४ रूपये बेकायदेशीररीत्या वाटप केले. याप्रकरणी प्रभारी गटविकास अधिकारी तांगडे यांची विभागीय चौकशीही करण्यात आली होती. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी विद्यमान प्रभारी गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Web Title: Gang Development Officer Tangade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.