गंगाधर पानतावणे म्हणजे महाराष्ट्राचे नालंदा विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:02 AM2018-10-28T01:02:46+5:302018-10-28T01:03:11+5:30
ज्ञान संपदेसाठी त्या काळात प्रसिध्द असलेले नालंदा विद्यापीठासारखीच ख्याती असलेले दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांची होती. त्यांनी आपले ज्ञानरुपी सागरातून त्यांनी अनेक लेखक, कवी, साहित्यीक, नाटककार, प्राध्यापक घडविले. आणि नवलेखकांना लिहिते केले असे बहुआयामी व्यक्तीमत्व डॉ. पानतावणे एक राज्याचे नालंदा विद्यापीठच होते, असे मत डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ज्ञान संपदेसाठी त्या काळात प्रसिध्द असलेले नालंदा विद्यापीठासारखीच ख्याती असलेले दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांची होती. त्यांनी आपले ज्ञानरुपी सागरातून त्यांनी अनेक लेखक, कवी, साहित्यीक, नाटककार, प्राध्यापक घडविले. आणि नवलेखकांना लिहिते केले असे बहुआयामी व्यक्तीमत्व डॉ. पानतावणे एक राज्याचे नालंदा विद्यापीठच होते, असे मत डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले.
३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या परिसंवादात ‘पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे बहुआयामी सांस्कृतीक व्यक्तिमत्व’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चिंतामन कांबळे उपस्थित होते. या परिसंवादात शत्रुघ्न जाधव, निलकांत चव्हाण, विश्वास वसेकर, सुरेश साबळे, नारायण राऊत, मिलिंद बागुल, संपत गायकवाड, सुशिला मुल - जाधव, डॉ. केशव देशमुख, डॉ. वासुदेव मुलाटे आदी वक्त्यांनी सहभाग घेतला होता.
मराठी सह, इतिहास, नाटक, संस्कृती आणि माणसांना ओळखण्याची त्यांची पारख होती. मराठी भाषाकोष निर्मीतीसाठी त्यांनी केलेले योगदान फार मोठे आहे. या परिसंवादातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू उलघडण्यास वेळ कमी पडले असे मत डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. पानतावणे यांना चिंतनशील स्वरुपाचे लेखन करुन समाजाला दिशा देण्याचे काम केले. ते एक चालते बोलते विद्यापीठच होते असे देशमुख म्हणाले.
डॉ. पानतावणे यांनी नवलेखकांना लिहिते केले. त्यांच्या अमुल्य मार्गदर्शनमुळेच मला लिहिण्याचे बळ मिळाल्याचे प्रा. शत्रुघ्न जाधव म्हणाले. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या पानतावणे सरांच्या बोलण्यात वागण्यात एकवाक्यता होती. नवलेखकांनी नाउमेद होऊ नये म्हणून त्यांनी अनेकांना लिखाणाची शैली कशीअसावी याविषयी याचे बारकावे सांगून अनेकांना घडविल्याचे डॉ. सुशिला मुल जाधव मत व्यक्त केले. अनेक चांगले, वाईट लेखन करणाºया लेखकांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ.पानतावणे यांनी केले. अनेक चळवळी आल्या गेल्या मात्र दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलन समाजाला दिशा देणारे साहित्य संमेलन ठरत आहे. डॉ. पानतावणे यांच्या स्वभावाचे विविध पैलू डॉ. मुलाटे यांनी सांगितले. एक लेखक कवी, नाटकार आदीसह ते एक कुटुंबवत्सल व्यक्तीमत्व होते असे मुलाटे म्हणाले. अस्मितादर्श चळवळ चालवितांना अनेक चढ उतार प्रसंगाना त्यांनी खंबीरपणे तोड दिले. मात्र कोणाचाही व्देष केला नाही. यातूनच त्याचे बहुआयामी व्यक्तमत्व समोर येते डॉ. मुलाटे म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. चिंतामन कांबळे यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांनी विद्यार्थी देशेपासून त्यांचा मला कसा सहवास लाभला याची आठवण करुन दिली. जात. धर्म, पंथ यांच्या पलिकडे जाऊन विचार करणारे डॉ. गंगाधर पानतावणे एक वेगळेच रसायण होते. त्यांच्यात मानवता होती. त्यांना जो कोणी भेटला त्याला त्यांनी बोलायला शिवविले, लिहायला शिवविले त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही उंची गाठल्याचे या परिसंवादाचे अध्यक्ष चिंतामन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. एकनाथ शिंदे तर अॅड. कैलास रत्नपारखे आभार मानले.
डोळस व्यक्तीमत्व
अनेक दलित, दलित्तेतर समाजातील नवलेखकांना डॉ गंगाधर पानतावणे यांनी नेहमीच लिखाणासाठी प्रोत्साहीत केले. राज्यासह देशभरात त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे डोळे घेऊन समाजासाठी डोळस काम करणारे एक बहुआयामी असे व्यक्तीमत्व डॉ. पानतावणे यांच्या आठवणी मान्यवरांनी यावेळी सांगितल्या.