गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:28+5:302021-03-05T04:30:28+5:30

गोरगरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळावे, तसेच महिलांची धुरापासून सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना ...

Gas price hikes have disrupted public financial planning | गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले

गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले

Next

गोरगरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळावे, तसेच महिलांची धुरापासून सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले. त्यामुळे महिलांची धुरातून सुटका झाली होती, परंतु मागील काही दिवसांपासून गॅसचे दर वाढत आहे. आता गॅस जवळपास ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बहुतांश महिला गॅसवर स्वयंपाक करण्याऐवजी चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे.

शासनाने दरवाढ कमी करण्याची मागणी

सर्वत्र अनलॉक झाल्यानंतरही रोजगाराचा अभाव आहे. दोन वेळेस पोट भरण्याची भ्रांत कायम असतानाही स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर तरी कसा आणायचा ? असा प्रश्न उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील चुलीतून पुन्हा धूर येऊ लागला आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब झालेली आहे. वाढत्या महागाईने तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. त्यात गॅसची दरवाढ ही डोकेदुखी बनली आहे. आम्ही आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस चुलीवर स्वयंपाक करतो.

मनिषा जाधव

गॅसचे दर वाढल्यामुळे चुलीचा वापर वाढला आहे. सरकारने रॉकेल देणे बंद करून सर्वसामान्य मोठे नुकसान केले आहे घरातील सर्व किचन गॅस वरच असल्याने आम्हाला महिन्याला एक टाकी लागते सरकारने दर कमी करावे.

आरती वैद्य

Web Title: Gas price hikes have disrupted public financial planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.