मोती तलावात लवकरच गौतम बुद्धांची मूर्ती उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:11 AM2018-02-08T00:11:01+5:302018-02-08T00:11:06+5:30
शहरातील मोती तलावात लवकरच भगवान गौतम बुध्दांची मूर्ती उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी येथे केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मोती तलावात लवकरच भगवान गौतम बुध्दांची मूर्ती उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी येथे केले.
शहरातील नूतन वसाहत भागात नगरसेवक विनोद रत्नपारखे यांनी आई फाऊंडेशनच्या वतीने मातोश्री रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त प्रभागातील नागरिकांना डस्टबीन, वाटपाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मातोश्री रमाई आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, राजकुमार पोळ, नगरसेवक जगदीश भरतीया, ईसा खान पठाण, अरूण मगरे, रवी जगदाळे, अनिल कांबळे, स्वच्छता विभाग प्रमुख माधव जमधडे, राहुल प्रधान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या कामात जनतेचा दररोज वाढत असलेल्या सहभागामुळे पालिका प्रशासनाला मदत होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्रथम क्रमांक पटकावणा-या प्रभागाला ३० लाख रूपयाचे बक्षीस शासनातर्फे देण्यात येणार असून, द्वितीय २० लाख आणि तृतीय १५ लाखांचे बक्षीस दिले जाईल.