प्लास्टिक सर्जरीसाठी जर्मन डॉक्टरांचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:38 AM2020-02-23T00:38:38+5:302020-02-23T00:39:30+5:30
जर्मनीमध्ये सुटी लागल्यानंतर हा सुटीतील वेळ समाजातील रुग्णांचे दु:ख कमी करण्यासाठी जर्मनी येथील डॉक्टर गेल्या १६ वर्षापासून पुढाकार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जर्मनीमध्ये सुटी लागल्यानंतर हा सुटीतील वेळ समाजातील रुग्णांचे दु:ख कमी करण्यासाठी जर्मनी येथील डॉक्टर गेल्या १६ वर्षापासून पुढाकार घेत आहेत. यंदाही जवळपास १० ते १२ जणांचे पथक जालन्यात शनिवारी दाखल झाले. त्यांचा रोटरी क्लब जालनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन उद्योजक राजेंद्र बारवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब आॅफ बॉम्बे, मिडटाऊनचे अध्यक्ष आबुझार झाकीर, जर्मन डॉक्टर पथकाचे प्रमुख डॉ. गेरहार्ड, रोटरी क्ल्बचे प्रांतपाल सुहास वैद्य, रोटरी क्बलचे अध्यक्ष सुदेश सकलेचा, सचिव डॉ. विजय जेथलिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील मिशन हॉस्पिटलमध्ये रोटरी आणि जर्मन डॉक्टराच्या मदतीने फाटलेले ओठ, चिकटलेली टाळू, भाजल्यामुळे आलेले अपंगत्व इ. किचकट विकारांवर अत्यंत खर्चिक असलेल्या शस्त्रक्रिया रोटरी क्लब आणि जर्मन डॉक्टर हे नि:शुल्क करत आहेत.