शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:40+5:302021-09-22T04:33:40+5:30
घाणेवाडीत १७ फूट पाणी जालना शहराला निजामकाळापासून पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात दोन दिवसांमध्ये पाच फूट पाणीपातळीत वाढ झाली आहे. ...
घाणेवाडीत १७ फूट पाणी
जालना शहराला निजामकाळापासून पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात दोन दिवसांमध्ये पाच फूट पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे जालन्याचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सध्या या तलावाचे पाणी विशेष करून नवीन जालना भागातील नागरिकांना पुरविले जात असल्याचे सांगण्यात आले. या तलावात सायंकाळी सहा वाजेपर्यंत १७ फूट पाणी साठले होते. आणखी पाण्याचा ओघ कॅचमेंट एरियातून सुरूच असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे यांनी दिली.
गाळ काढल्याने मोठा फायदा
जालना शहरासाठी वरदान ठरलेल्या घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्यासाठी घाणेवाडी जलसंरक्षण मंचने पुढाकार घेऊन त्यातील लाखो ब्रास गाळ काढला. त्यामुळे तलावाची खोली वाढली असून, त्याचा मोठा लाभ अधिकचा जलसाठा होण्यास होत आहे. हा तलाव सोमवारी सांयकाळपर्यंत तुडुंब भरला असून, तो रात्री पूर्णक्षमतेने भरून ओसंडून वाहील, अशी आशा करण्यास हरकत नाही.
ओमप्रकाश चितळकर, सदस्य घाणेवाडी जलसंरक्षण मंच जालना.