उंच माझा झोका गं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:45 AM2019-05-29T00:45:07+5:302019-05-29T00:45:50+5:30

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे.

Girls ahead in HSC results | उंच माझा झोका गं....

उंच माझा झोका गं....

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मंगळवारी इयत्ता बारवीचा निकाल जाहीर केला. त्यात यंदाही मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ९ हजार २८५ विद्यार्र्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून, ज्याची टक्केवारी ९०. ८७ टक्के येते. जालना जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.१२ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा ९४.७५, कला शाखेचा ७९.५७ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेसाठी एकूण १२ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात विशेष प्राविण्यासह ८६२, प्रथम श्रेणीत ६६७०, द्वितीय श्रेणीत ४१९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत विशेष प्राविण्यात ५६८, प्रथम श्रेणीत ६ हजार २८, द्वितीय श्रेणीत ३ हजार ८९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत ३१९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणीत ९५७, द्वितीय श्रेणीत ७५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमात ३७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २२४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जालना जिल्ह्याचा निकाला यंदा थेट ८७ टक्के लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये सर्वत्र उत्साही आणि आनंदाचे वातावरण दिसून आले. निकाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध नेट कॅफेवर गर्दी केली होती. दरम्यान काही काळ बोर्डाची वेबसाईट ही जाम झाली होती. त्यामुळे एक ते दोन वाजेच्या दरम्यान निकाल कळण्यास विलंब झाला. नंतर मात्र, ही वेबसाईट पूर्ववत सुरू झाल्याने निकालाची सत्यप्रत काढण्यासाठी गर्दी झाली होती.
भोकरदन तालुक्याचा सर्वाधिक ९४ टक्के निकाल
जालना तालुक्याचा एकूण निकाल ८६.७६, बदनापूर तालुका ८०.०६, अंबड तालुका ८६.८९, परतूर तालुका ८०.०६, घनसावंगी तालुका ६६.५४, मंठा तालुका ८२.१४, भोकरदन तालुका ९४.६५, जाफराबाद तालुका ८७.४६ टकके निकाल लागला आहे. विज्ञान शाखेने यंदा निकालात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे कारण शिक्षण तज्ज्ञांकडे विचारले असता, विज्ञान शाखेला प्रॅक्टिलचे गुण हे सहज उपलब्ध होत असल्याने विज्ञान शाखेचे टक्केवारी नेहमीच वाढलेली असते.

Web Title: Girls ahead in HSC results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.