शेतकऱ्यांना वीज उत्पादनासह वृक्ष संवर्धनाचा रोखीने मोबदला द्यावा- बोराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:37 AM2019-06-02T00:37:10+5:302019-06-02T00:37:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना सौरपंप देण्यासह लावलेली झाडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना सौरपंप देण्यासह लावलेली झाडे संगोपन करून त्यांची वाढ करण्याची जबाबदारी शेतक-यांवर देऊन त्या बदल्यात त्यांना रोख मोबदला देण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांनी केले. ते बाजार समितीच्यावतीने आयोजित आंबा महोत्सवात बोलत होते.
या आंबा महोत्सवाचा शुभारंभ वेशास शेष महाराज गोदींकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव, कृषी उपसंचालक विजय माईनकर, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, अभिमन्यू खोतकर, सभापती पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती होती. प्र्रास्ताविक बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी केले.
पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, आज कोरडवाहू शेतकरी अडचणित आहे. त्यामुळे सौर उर्जा निर्मितीचे पॅनल अनुदान तत्वावर शेतक-यांना देऊन त्यातून निर्मित होणारी वीज ही वीज वितरण कंपनीने खेरदी करावी. तसेच वृक्ष लागवड आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही शेतक-यांकडे दिल्यास ती झाडे जिवंत राहतील. त्या बदल्यात त्यांना पर्यावरण कर म्हणून रोखीने मदत करावी असे आवाहन केले. जालन्यात रेशीम उपसंचालक कार्यालय सुरू करण्यासाठी देखील खोतकरांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या दोन्ही बाबी आपण मुख्यमंत्री आणि वन विभागाच्या सचिवांशी बोलून लगेच यावर विचार करू असे आश्वासन दिले.
यावेळी खोतकर म्हणाले की, या आंबा महोत्सवातून शेतकºयांना थेट मदत करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी अरविंद चव्हाण, भास्कर अंबेकर, शेष महाराज गोदींकर, रत्नागिरी बाजार समितीचे सभापती दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंब्यांची विक्री जोरात झाली.