उसाला ३,५०० रूपये भाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:41 AM2017-11-30T00:41:12+5:302017-11-30T00:41:27+5:30
राज्यात उसाला ३५०० हा एकच उचल भाव देण्यात यावा आणि ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने उसाला योग्य भाव न दिल्यास ४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : राज्यात उसाला ३५०० हा एकच उचल भाव देण्यात यावा आणि ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने उसाला योग्य भाव न दिल्यास ४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
परिसरातील शेतकºयांची बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी उस उत्पादक शेतकºयांच्या सखोल चर्चा करण्यात आली. कोल्हापूर परिसरातील शेतकºयांना वेगळा न्याय आणि उर्वरीत राज्यातील शेतकºयांना वेगळा न्याय खपवून घेतला जाणार नाही.
यामुळे सर्व शेतकºयांना समान न्याय देण्याची मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार असल्याने परिसरातील शेतकºयांनी या आंदोलनता सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी गोविंद आर्दड, आसादार आर्दड, अमोल आर्दड, गणेश मोताळे, महेश राऊत, विकास व्यवहारे, मोहन मोहिते, विजयानंद शेळके, सतीश राऊत, किशोर आर्दड, विष्णू आर्दड, ज्ञानेश्वर घुमरे, नामदेव बहीर, बाळू आर्दड, बाबू खोले आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.