गौरवास्पद ! २१ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:17 PM2020-07-22T23:17:42+5:302020-07-22T23:18:11+5:30

कोरोना काळात लढणाऱ्या योद्ध्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मिळाली बढती

Glorious! 21 Police Constables promoted to Assistant Sub-Inspector of Police | गौरवास्पद ! २१ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

गौरवास्पद ! २१ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

Next

जालना : जिल्हा पोलीस दलातील २१ पोलीस हवालदारांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार सहायक पोलीस उपनिरीक्षपदी (एएसआय) पदोन्नती दिली आहे. कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या या योद्ध्यांना बढती मिळाली आहे.

बढती मिळालेल्यांमध्ये पोलीस मुख्यालयातील हवालदार हेमराज तुळशीराम शेंडीवाले, बाबासाहेब लिंबाजी कोर्डे, विजय बाबुलालजी बॉनियाँ, गजानन श्रीराम उज्जैनकर, मोटार परिवहन विभागातील बापूसाहेब राधाकृष्ण जोशी, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अरूण यादवराव व्यवहारे, कैलास रामविलास शर्मा, आर्थिक गुन्हे शाखेतील रवींद्र बबनराव जोशी, शहर वाहतूक शाखेतील सिमोन साहेबराव कसबे, संजय श्रीहरी राऊत, सदरबाजार पोलीस ठाण्यातील प्रदीप प्रकाशराव घोरपडे, महामार्ग सुरक्षा पथकातील ऋषींद्र विठ्ठलराव राऊत, भानुदास वामनराव पिंपळे, कदीम पोलीस ठाण्यातील इसामोद्दीन शहाबोद्दीन सय्यद, बदनापूर ठाण्यातील धनसिंग गब्बरसिंग जारवाल, संग्रामसिंग प्रकाशसिंग ठाकूर, परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील रशीद गफूर शेख, परतूर ठाण्यातील प्रल्हाद नामदेव गुंजकर, अंबड ठाण्यातील शहाजी अण्णासाहेब पाचरणे, हसनाबाद ठाण्यातील राजू भाऊसाहेब उणगे, राजू सखाराम वाघमारे यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे.

नियमानुसार पदोन्नती
जिल्हा पोलीस दलातील २१ हवालदारांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधित अधिका-यांनी यापुढील काळातही अधिकाधिक चांगले काम करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

Web Title: Glorious! 21 Police Constables promoted to Assistant Sub-Inspector of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.